Sanjay Raut | महाराष्ट्रात लोकसभेचा धक्कादायक निकाल लागला आहे. राज्यात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीने 30 जागा काबिज केल्या आहेत. त्यात भाजपला 10 जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रातील पराभव हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.
काल 5 जूनरोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. या अपयशाला आपण कारणीभूत असल्याचं सांगत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
संजय राऊत यांचं ट्वीट
फडणवीस यांच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत त्यांना डिवचलं आहे. “मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”, असं म्हणत राऊत (Sanjay Raut) यांनी सणसणीत टीका केली आहे.
“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन.. असे गळा फ़ोडून सांगणारे आता मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत.छान! महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!”, असं ट्वीट संजय राऊत राऊत यांनी केलंय.
मी पुन्हा येईन…पुन्हा येईन..
लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन
असे गळा फ़ोडूनसांगणारे
आता:
मला जाऊदे ना घरी
वाजले की बारा
अशी रेकॉर्ड लावत आहेत.
छान
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणारनाही.
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत
जय महाराष्ट्र!@BJP4Mumbai… https://t.co/RY0bm96tHQ— Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2024
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. त्यांनी मला सरकारमधून मुक्त करावं.ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीन.”, असं फडणवीस म्हणाले आहेत. (Sanjay Raut)
फडणवीस यांच्या निर्णयानंतर त्यांच्याशी अमित शाह यांनी देखील फोन द्वारे चर्चा केली. महाराष्ट्रातील पराभव हा फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचं म्हटलं जातंय. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील नेते त्यांना टार्गेट करत आहेत.
News Title – Sanjay Raut on Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या-
“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट
राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
मोदींच्या सभा फेल!, 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी आला पराभव