मुंबई | आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे, असं शिवसेने आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतेय हे या अपक्ष आमदारांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे, असं राऊत म्हणालेत.
एका निवडणुकीत विजय झाला आणि पराभव झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं, असं होत नाही. निवडणूक आयोगाला हाताशी धरून कशा प्रकारे खेळ खेळला जात होता, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, असंही ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…
राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”
‘अब देवेंद्र अकेले ही नहीं, सारी कायनात उनके साथ है’- अमृता फडणवीस
Comments are closed.