Sanjay Raut l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या पायाशी गहाण आहेत असं संजय राऊत म्हणले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाणाच्या गप्पा मारु नयेत :
आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जो माणूस स्वत: मोदी-शाहांच्या पायाशी गहाण आहे. त्यामुळे त्याने धनुष्यबाणाच्या गप्पा मारु नयेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण हा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने मिळाला आहे अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली केली.
यावेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांचा उल्लेख देखील केला आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे नेते हे ईडीपासून बचाव करण्यासाठी तसेच आपली कातडी वाचवण्यासाठी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी भाजप पक्षासोबत गेले आहेत असं देखील ते म्हणाले आहेत.
Sanjay Raut l अनेक नेते भीतीमुळेच भाजप पक्षासोबत गेले :
याशिवाय सध्या या सगळ्या नेत्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल्स या कपाटात बंद करुन ठेवल्या सल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रताप सरनाईक हे नेते या भीतीमुळेच भाजप पक्षासोबत गेले आहेत. मात्र आता महायुतीचे सरकार जाणार असल्याने या नेत्यांना देखील भीती नाही. या सगळ्या नेत्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये हवं ते साध्य देखील केलं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
News Title : Sanjay Raut on Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या –
आजपासून राज्यात पंतप्रधानांच्या कधी व कुठे सभा? पाहा संपूर्ण वेळापत्रक
कोथरूडचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांत पाटील
“ED पासून सुटका व्हावी म्हणून भाजपसोबत..”; छगन भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट
HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका! ग्राहकांचे EMI ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार
मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन