…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!

 नाशिक|मुख्यमंत्र्यांमध्ये दैवी शक्ती आहे, असा दावा करणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

संजय राऊत यांनी शुक्रवारी नाशिकचा धावता दौरा केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांमध्ये दैवी शक्ती आहे, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी महाजनांवर हल्ला चढवला. 

मुख्यमंत्र्यांमध्ये दैवी शक्ती असेल तर त्यांची आरती ओवाळणं बंद करा आणि त्या शक्तीच्या आधारे राज्यातील दुष्काळ दूर करा, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

महत्वाच्या बातम्या-

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

-सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..