गुजरात निवडणुकीसाठी राज्यातून पाण्यासारखा पैसा, संजय राऊतांचा आरोप

नाशिक | गुजरात निवडणुकीसाठी मुंबईसह राज्यातून पाण्यासारखा पैसा चाललाय, असं धक्कादायक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. नाशिक दौऱ्यावर असताना राऊत यांनी असा आरोप केला.

गुजरात निवडणुकीसाठी राज्यातून पाण्यासारखा पैसा चाललाय. पण भाजपविरोधी वातावरण आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शिवसेना गुजरातच्या निवडणुकीत उतरणार आहे. पक्षाने तेथील 40 ते 50 जागा लढवण्याच निर्णय घेतलाय, असंही राऊत यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार, उत्तर महाराष्ट्राच्या जोरावर शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला.