“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”

Sanjay Raut | राज्यभरात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची चर्चा आहे. महायुतीकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जात आहे. या राखी पौर्णिमेला राज्यातील बहीणींच्या खात्यात 1500 रुपये टाकले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. याचा लाभ घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या योजनेबाबतच आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असं रवी राणा म्हणाले होते. (Sanjay Raut)

त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीकडून जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे. आमची सत्ता आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे वाढवू, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आज (13 ऑगस्ट) ते माध्यमांशी संवाद साधत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत आणि ते असे बोलतात. सगळे नेते असेच त्यांच्या सारखे बोलताय. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहे का? यांची मानसिकता सरकारी पैशाने मते विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. “बारामतीमध्ये अजित पवार स्वतः पराभूत होणार आहेत. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी तर नगरसेवकांची किंमत 5 कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये?, तेही पैसे मत दिले नाही तर परत घेण्याची भाषा केली जात आहे”, अशी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

रवी राणा नेमकं काय म्हणाले होते?

अमरावती येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्या दरम्यान आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं की, “तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन.”, त्यांच्या या विधानावरूनच आता वाद रंगला आहे. मविआ नेत्यांकडून यावर (Sanjay Raut) सडकून टीका केली जात आहे.

दरम्यान, भाजपाकडून राखी पौर्णिमेनिमित येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी राज्यभरात ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधणार आहेत.

News Title :  Sanjay Raut on ladki bahin yojna  

महत्वाच्या बातम्या-

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले

‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’, राखी पौर्णिमेनिमित भाजपचा खास प्लॅन

या राशीच्या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवा अन्यथा…

Diabetes आणि BP कंट्रोलमध्ये ठेवतील ‘हे’ 5 पदार्थ; वजनही होईल कमी

‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!