संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, मटन अन् ..; संजय राऊतांनी हिंदुत्वावरून सुनावलं

Sanjay Raut | राज्यात सध्या नागपूर अपघात प्रकरण चांगलंच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये काही जणांना दुखापत झाली आहे. तसेच गाड्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. अपघात झालेल्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर आहे. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी देखील महायुतीवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. आज (11 सप्टेंबर) ते माध्यमांशी संवाद साधत होते. “तो कोणाचाही मुलगा असेल? कायदा सर्वांसाठी समान हवा आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, असा संताप यावेळी राऊत यांनी व्यक्त केला.

“हिंदुत्व शिकवणाऱ्यांना गोमांस चालतं का?”

तसेच संकेत बावनकुळे यांच्या हॉटेल बिलबाबतही राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. “जी व्यक्ती वाहन चालवत होती त्याचे नाव बदलण्यात आले आहे. तसेच लाहोरी बार मध्ये जे बिल आहे ते लोकांसमोर आले पाहिजे. त्या बिलात दारूचा उल्लेख आहे. सोबतच त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा अर्थात गोमांस याचा देखील उल्लेख आहे आणि हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“हा अपघात जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने केला असता, तर काय झालं असतं त्याचा विचार करा. पोलिसांनी त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला पकडून, त्याच्या मित्राला धरुन धिंड काढली असती. सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. मी तो कुणाचा मुलगा आहे, हे मानत नाही. तो कोणाचाही मुलगा असेल? पण कायदा सर्वांसाठी समान असायला हवा.”, असं राऊत (Sanjay Raut )म्हणाले.

“फडणवीस हे पाप कुठे फेडाल?”

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील राऊत यांनी जोरदार टीका केली.”फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्याप्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय, तुम्ही अनिल देशमुखांना अटक करायला निघाला आहात. पण तुमच्या पक्षातील एका नेत्याने दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केलाय, त्याला तुम्ही अभय देताय, ही पापं कुठे फेडाल?”, असा संताप राऊत (Sanjay Raut )यांनी व्यक्त केला.

News Title –  Sanjay Raut on Nagpur hit and run case 

महत्वाच्या बातम्या- 

कुठे अतिवृष्टी तर कुठे विश्रांती; राज्यात आज कसं राहील हवामान?

अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;

पुणे शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते आजपासून बंद राहणार; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

पुढील 2 महीने ‘या’ 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा!

लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?