मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली आहे. लस टोचतेवेळी मोदींचा पोशाख आणि इतर योगायोगातून त्यांच्यावर राजकारण केल्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संजय राऊत यांनी मोदी हे अत्यंत सरळमार्गी नेते असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
सध्या मोदींची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर सुरू असल्याचंही संजय राऊत बोलले. सोमवारी लस घेताना मोदींनी गळ्यात आसामी महिलांचा आशीर्वाद मानला जाणारा एक रुमाल घातला होता. तसेच, ज्या नर्सकडून त्यांनी लस टोचून घेतली त्यापैकी एक नर्स पुद्दुचेरीच्या आहेत तर दुसऱ्या केरळमधील आहेत.
निवडणूक आयोगाकडून नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत भाष्य केलं आहे.
मोदी यांच्या कृतीकडे राष्ट्रीय एकात्मता म्हणून पहावे कारण राष्ट्रीय एकात्मता ही काय एकट्या काँग्रेस पक्षाची मक्तेदारी नाही. मोदींनी अगदी सहज हा पेहराव केला असेल आणि हे सर्व योगायोगाने जुळून आलं असेल, मोदी हे तसे खूप सरळमार्गी नेते असल्याची खोचक टीकाही यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”
पूजा चव्हाणची आजी म्हणणाऱ्या शांताबाईंचं पितळ उघडं, पूजाच्या वडिलांनी केला मोठा खुलासा
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, म्हणाले…
“…तर अशा वादळांची सरकारला आता सवय झालीये”
…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!
Comments are closed.