…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

नवी दिल्ली | 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सत्तेत असलेल्या राज्यातील मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्यावी लागतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, अकाली दल आणि इतर मित्रपक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एनडीएतील मित्रपक्षांची स्थिती त्यांच्या राज्यात चांगली आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती बसवू नका; अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

‘अजित पवारांना हवीय राज ठाकरेंची साथ’, मात्र राष्ट्रवादीतून होतोय विरोध!

-नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? PMO म्हणतं आम्हाला माहिती नाही…!

नेत्यांच्या मुलाकडे की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे; राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यपद कुणाकडे?