Top News महाराष्ट्र मुंबई

गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

मुंबई | भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर आजचाच्या सामनाच्या अग्रलेखातून मुंबई-पुण्यातील लोकसंख्या कमी करावी म्हणजे नक्की काय करावे याचा मार्ग गडकरी यांनी सांगायला हवा, असा उलट सवाल विचारण्यात आला आहे. तसंच परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे मुंबईची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यामध्ये किती जमीन-अस्मानाचा फरक पडलाय हे संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखात लिहीलं आहे.

संजय राऊत अग्रलेखात म्हणतात-

“मुंबई नक्की कशी होती व आज तिची काय अवस्था झाली? आजच्या मुंबई शहराकडे पाहून एकदा येथे माणसांच्या तुरळक वस्तीची राने व त्यात विविध प्रकारची रानटी जनावरे होती, अशी कोणाला कल्पनादेखील करवणार नाही.”

“पण व्यापारी इंग्रजांनी या बेटाचा कब्जा घेतला आणि राज्यकारभार आरंभला. समुद्रकिनाऱ्या वरील एक बेट (1670) व त्यावर दीड-दोन हजार कोळय़ांची वस्ती, किर्रर्र झाडी, नारळी-पोफळी आणि ताडा-माडाचीच झाडे असे मुंबईचे चित्र होते. कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी, पाठारे-प्रभू अशा मूळ मुंबईकरांची ही भूमी आज मराठी माणसांपेक्षा परप्रांतीयांचीच जास्त झाली आहे.”

“मुंबईतील कापड गिरण्या हे एकेकाळी वैभव होते. गिरणी कामगारांच्या ताकदीने महाराष्ट्राला मुंबई आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या गिरण्या बंद झाल्या”, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.

गडकरींना सामनातून कानपिचक्या-

मुंबई-पुण्याची गर्दी कमी कशी करायची? उत्तर प्रदेश-बिहारमध्ये मुंबई-पुण्यासारखी स्मार्ट शहरे उभी केली व तेथे रोजगार उपलब्ध झाला तरच मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल. केंद्राने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांकडे आणि दिल्लीसारख्या शहरांकडे जास्त लक्ष दिले तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल. महाराष्ट्राच्या विकासाचे काय ते आम्ही पाहू. मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल. कोरोनाची पर्वा न करता मुंबई-पुण्यावर गर्दीचे लोंढे आदळत आहेत. कोरोना संकटावर भुकेची आग मात करीत आहे असाच याचा अर्थ. मुंबईच्या गर्दीचे हेच कारण आहे!

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

शुभमंगल साssवधान!, लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी 15 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

महत्वाच्या बातम्या-

तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद

औषधोपचारात महाराष्ट्र जगाच्या बरोबरीने उभा, काही औषधे मोफत देण्याचा सरकारचा विचार- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या