Sanjay Raut | राज्यात आता लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडला आहे. आता अनेकांचं लक्ष हे पाचव्या टप्प्याकडे लागलं आहे. पाचव्या टप्प्यात सुरू असलेल्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईच्या रस्त्यांवर रोड शो करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावलं आहे.
“शेवटी मोदींना रस्त्यावर आणलं”
पंतप्रधान मुंबईमध्ये येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे. यामुळे आता संजय राऊत यांनी शेवटी मोदींना रस्त्यावर आणलं गेलं, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. त्यानंतर त्यांनी आसामच्या जागेवर भाष्य केलं आहे. यंदा आसाममध्ये भाजपची एकही जागा येणार नाही, असं तिथले मुख्यमंत्रीच म्हणत होते. काशीचा निर्णय तिथली जनता घेईल. हेमा मालिनी हरणार आहेत, असं भाकीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
मुंबईतल्या पंतप्रधानांच्या रोडशोवरील प्रश्नावर संजय राऊत यांनी खोटक उत्तर दिलं ते म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी करणारे गृहस्थ आहेत’, असं उत्तर देत खोचक टोला लगावला आहे. त्यांनी मुंबईच्या सहा जागांवक भाष्य केलं. महाविकास आघाडी मुंबईमध्ये सहा जागा लढवत आहेत. यामुळे सहाच्या सहाही जागा मुंबई जिंकणार असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
“मोदींना काही काम नाही का?”
मोदींना मुंबईमध्ये दररोज ठाण मांडून बसावं लागत आहे. तुमच्यावर दररोज भटकण्याची ही वेळ का आली आहे. हे लोकंना कळू द्या, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मोदी देशभरात रोडशो करत आहेत. त्यांना काही काम नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी हे मणीपूरला गेले नाहीत का? काश्मिरी पंडीतांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. 18 लोकांचे मृतदेह आढळले, त्यांच्याशिवाय संवेदना नाहीत. आज तिथे जाऊन नाटक करतील. मोदी मुंबईत, महाराष्ट्रात जिथं जातील तिथं पराभव निश्चित असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलाय. उमेदवार कोणी असो, मोदी नको. मोदी गो बॅक ही गावागावातील घोषणा आहे”, असं संजय राऊत म्हणाले. तिथे निवडणुका झाल्या तिथे महाविकास आघाडी 90 टक्के जागा जिंकणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
News Title – Sanjay Raut On Pm Modi Road Show
महत्त्वाच्या बातम्या
ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्याच्या भाव घसरले; जाणून घ्या दर
बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक
मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? आकडेवारी एकूण व्हाल थक्क