बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

पुणे | यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकात शिवसेनेच्या हाती फारसं यश आलं नाही. पण आता या अपयशाला मागे टाकत आगामी महापालिका निवडणुकीचं लक्ष समोर ठेऊन शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पाठोपाठ आता संजय राऊतांनीही त्यांचा मुक्काम पुण्यात हलवला आहे.

खासदार संजय राऊत मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले. पुण्यात येताच राऊतांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. रात्री उशिरा त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वॉर्डाची स्थिती, शिवसेनेची स्थानिक पातळीवरील गटबाजी, संघटनात्मक बांधणी या विषयांवर चर्चा झाली. तर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या सततच्या पुणे दौऱ्यामुळे बदलणारे राजकीय वारे याबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे आणि डोळ्यासमोर पहिलं लक्ष्य पुणे महापालिकेचं ठेवल्याचं दिसत आहे. कारण संजय राऊतांचा गेल्या दोन महिन्यातील हा तिसरा पुणे दौरा आहे. संजय राऊत आजही पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. यात पुण्यातील वेगवेगळ्या भागातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.

या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा तसेच जर शिवसेनेला स्वबळावर निवडणुका लढवायची वेळ आली तर शिवसेना किती जागांवर लढू शकते, याचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महापालिका जिंकण्यासाठी शिवसेेनेसह मनसे, राष्ट्रवादी आणि भाजपनेही रणनिती आखायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेचा गड कोण राखणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील रिक्षा प्रवास महागणार; असे असणार नवे दर

“आपलं घराणं कुठलं, करताय काय?” शिवेंद्रराजेंचा उद्यनराजेंना खोचक टोला

समीर वानखेडेंच्या पाठीशी आहे ‘या’ व्यक्तीचा आशिर्वाद; क्रांती रेडकरने केला खुलासा

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More