राफेल डील तर बोफोर्सचा बाप आहे- संजय राऊत

मुंबई | राफेल डील प्रकरण हे बोफोर्स घोटाळ्याचा बाप अाहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील एका लेखात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

बोफोर्स घोटाळ्यामध्ये 65 कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप करणारे आता सत्तेत आहेत. मग त्यांच्या राफेल जेट विमानांच्या व्यवहारात 700 कोटी कोणाच्या खिशात गेले, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, देशात निवडणुका लढवण्यासाठी लागणारा पैसा बोफोर्स आणि राफेलसारख्या व्यवहारांमधून उभा केला जातो हे देशाचे दुर्देव आहे, असंही राऊतांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-SBI चा ग्राहकांना झटका; ATM मधून दिवसाला फक्त 20 हजारच काढता येणार!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

-…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

-संभाजी भिडेंसोबत फडणवीस सरकारनं आणखी कुणाविरुद्धचे गुन्हे मागे घेतले?