2019 साली मोदी सरकारचा पिक्चर पूर्ण होईल- शिवसेना

मुंबई | गुजरातच्या निवडणुका ट्रेलर होता, राजस्थानच्या पोटनिवडणुका इंटरव्हल आहेत, तर 2019 साली मोदी सरकारचा पिक्चर पूर्ण होईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

राजस्थानमध्ये 2 लोकसभा आणि एका विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. तिन्ही जागांवर काँग्रेसने बाजी मारली. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपला जोरदार चिमटे काढले. 

2019ची ची लोकसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही. एकदा बाणातून सुटलेला तीर परत येत नसतो, असंही ते यावेळी म्हणाले.