Top News विधानसभा निवडणूक 2019

शरद पवार शेतकऱ्यांसोबत आहे… त्यांचं आता भलं होईल- संजय राऊत

मुंबई |  शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील तर त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. शरद पवार शेतकऱ्यांसोबतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईलच, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस जोडले गेलेले आहेत जे अनेक काळ सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आम्हाला शेतकरी प्रश्नांवर अधिक काम करणं गरजेचं आहे ते काम आम्ही करूच. राज्याचा कारभार चालवण्यात आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं राज्यासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे, असं सांगत त्यांनी आघाडीच्या नेत्यांचं आजच्या पत्रकार परिषदेत तोंडभरून कौतुक केलं.

दरम्यान, राज्यात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल, अशीही गर्जना त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या