आमच्या प्रेरणेमुळे टीडीपीनं भाजपची साथ सोडली- संजय राऊत

मुंबई | शिवसेनेच्या प्रेरणेमुळे टीडीपीनं एनडीएची साथ सोडली असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसेच आम्ही काय करायचं हे माध्यमांनी आम्हाला सांगू नये, असंही ते म्हणाले. 

गेल्या 4 वर्षांपासून आम्ही भूमिका घेतोय. चंद्राबाबू यांनी आता त्यांच्या राज्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 

टीडीपी हा एनडीएमध्ये कायमस्वरुपी राहणारा पक्ष नाही. ते कधी यूपीएमध्ये असतात तर कधी तिसऱ्या आघाडीत, 2014 मध्ये मोदींची हवा असल्याने ते एनडीएत गेले असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत.