मुंबई | आज विधानपरिषदेच्या 10 जागासांठी मतदान पार पडत आहे. यावर शिवेसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीचे सगळे आमदार एकत्र आहेत. आज रात्री 8 वाजता याची प्रचिती याईलच. महाविकास आघाडीमधले सगळे नेते हातात हात घालून चालत आहेत. धोका वैगेरे असे शब्द आता वापरणं योग्य असणार नाही. तसेच आम्हाला जर धोका आहे तर तो समोरच्यांनाही असेल ना? हा धोका एकतर्फी तर नसेलच ना? असा सवाल त्यांनी केला.
जंयत पाटलांच्या बोलण्यात तथ्य आहे. कारण आमदारांना सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. लोकशाहीला मालक निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात हे आम्ही चालु देणार नाही. आजची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे, असंही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यसभेप्रमाणे विधानसभेची ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पाचव्या जागेसाठीची लढत भाऊ जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी असणार आहे. मत बाद होऊ नये यासाठी आमदारांची रंगीत तालीम ही घेण्यात आली आहे.
मतांंची बेरीज बघता महाविकास आघाडीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानांची परवानगी न मिळाल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जाधव आजारी असताना देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहेत. गुप्त मतदान असल्यानं मतांची फाटाफुट होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता येणारा निकाल पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना!
‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; बिचुकलेंनी सांगितलं गणित
‘सदाभाऊंच्या जीवाला धोका आहे असं वाटत नाही पण..’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
“कैद्यांनाही मतदानाचा अधिकार मग आमच्या मलिकांना आणि देशमुखांना का नाही?”
नीरज चोप्राचा सोनेरी विजय, केला आणखी एक अप्रतिम
Comments are closed.