Worli Hit and Run | पुणे पोर्श अपघात प्रकरण हे काही नवीन नाही. यामुळे राज्यात संतापाची लाट आहे. याचपार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चहूबाजूने फिल्डींग लावली आहे. अशातच ड्रंक अँड ड्राईव्हचा देखील तपास केला जात आहे. मात्र पुणे पोर्शे अपघात प्रकरण होताच राज्यात मुंबईतील वरळी हिट अँड रनप्रकरण (Worli Hit and Run) समोर आलं आहे. या अपघातात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. मात्र मराठी फिल्म इंडस्ट्री मूग गिळून गप्प का? असा सवाल आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
या घडलेल्या प्रकरणात आता शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह आहे. याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच यासोबतच मिहीरची आई आणि बहीण या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. या दोघींनी मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात मिहीरने कावेरी नाखवा यांना गाडीने धडक देत फरफटत दूरपर्यंत नेलं. कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.
यावर संजय राऊत यांनी आता मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकरांवर सवाल उठवले आहेत. राऊतांनी त्यांच्या अस्मितेवर भाष्य केलं आहे. मराठी इंडस्ट्रीतील सहकलाकाराच्या नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू होतो आणि संपूर्ण इंडस्ट्री मूग (Worli Hit and Run) गिळून गप्प बसते, अशी तिखट टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“या राज्यातील सरकार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीला पाठिंबा देणारं आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात हेच घडलं. ज्याप्रकारे त्या निरापराध महिलेला वारंवार गाडीखाली चिरडलं गेलं, तो एखादा नशेल असलेला, पैशांची मस्ती असलेला नराधमच करू शकतो. या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी करायला हवी. हा खटला आता फर्स्ट ट्रॅक कोर्टात चालावा. हिट अँड रनप्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या मराठी अभिनेते जयवंत वाडेकर यांच्या नातेवाईक आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Worli Hit and Run)
“मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”
“कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? एरव्ही आपल्या कमेंट्स देत असतात. त्यांनी बोललं पाहिजे. कसला टाळकुटेपणा मराठी इंडस्ट्री करतेय? आपल्या मराठी सहकाऱ्याचे नातेवाईक रस्त्यावर चिरडले गेले आहेत. तुम्ही याप्रकरणावर मूग गिळून गप्प बसले आहात. तुमच्यामध्ये कसा मराठीपणा आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“सरकारकडून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे हिट अँड रन प्रकरण काही सर्वसामान्य नाही. पुण्यातील हिट अँड रनप्रकरणात जसे अग्रवाल फॅमिली होती. तशीच वरळी हिट अँड रनप्रकरणात शाह फॅमिली आहे. मुलांच्या वडिलांचा क्रिमिनल रेकॉर्ड पाहा. त्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडे नसतील तर आम्ही देतो. बोरिवली पोलीस स्टेशनजवळ जाऊन त्यांचा रेकॉर्ड तुम्ही तपासून पाहा. आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Worli Hit and Run)
News Title – Sanjay Raut on Worli Hit and Run Case
महत्त्वाच्या बातम्या
“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”
आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार?; ‘त्या’ नेत्यांची पुन्हा शरद पवारांकडे वाटचाल?
“छगन भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत”; जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
कार खरेदी करायचीयं? तर येत्या काळात तुमच्यासमोर आहेत ‘हे’ बेस्ट ऑप्शन