“वरळी अपघातातील आरोपीचे मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध, आरोपी सुरतला पळाला की गुवाहाटी?”

Worli Hit And Run | रविवारी 7 जुलैरोजी मुंबईत पहाटेच एका महिलेला भरधाव कारने फरफटत नेल्याची घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते असून त्यांचा मुलगा मिहीर शहा (Mihir Shah)हा सध्या फरार आहे.

अपघात झाला तेव्हा मिहीर शहा हा गाडीमध्ये होता, अशी माहिती समोर (Worli Hit And Run) आली आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतप्त सवाल केले आहेत.

संजय राऊत आज (9 जुलै) माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी वरळी अपघात प्रकरणावरून राज्य सरकारला घेरलं. हिट अँड रन करून पळालेला मिहीर शहा सुरतमध्ये आहे की, गुवाहटीमध्ये?, असा थेट सवालच राऊत यांनी केलाय.

संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

“या प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि त्याचे वडील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मला असं कळालंय की, त्यांचे व्यावसायिक संबंधही आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत.”, असं राऊत म्हणाले आहेत. एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा?, असा प्रश्न देखील राऊत यांनी उपथित केलाय.

“हा मिहिर शहा गेलाय तरी कुठं?, कुठे ठेवलंय त्याला सूरतला की, गुवाहाटीला लपवलंय? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा.”, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. गाडीखाली एक मराठी कोळी दाम्पत्य चिरडलं गेलं, याला कोण जबाबदार आहे?, राज्यात आज कायदा-सुव्यवस्था नाहीच, हे(Worli Hit And Run) मला खात्रीनं सांगावसं वाटतंय, असंही राऊत म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

वरळीमध्ये मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला रविवारी पहाटे साडे पाच वाजता चार चाकीने फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील ॲट्रीया मॉलजवळ ही घटना घडली. वरळी (Worli Hit And Run Accident)कोळीवाडा परिसरात राहणारे नाखवा दाम्पत्य हे सकाळी मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

कोळी दाम्पत्य दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर जाऊन पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या (Worli Hit And Run Accident ) बोनटवरून बाजूला उडी टाकली. पण, महिलेला तेथून बाजूला होता आलं नाही. याचवेळी घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता सुसाट पळवली आणि त्यात कोळी महिला फरफटत गेली. यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

News Title – Sanjay Raut on Worli Hit And Run

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात अतिवृष्टीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; बळीराजा पुन्हा हवालदिल

अभिनेत्याची भरपावसात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांसोबत सेल्फी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वसंत मोरेंवर उद्धव ठाकरे टाकणार ‘ही’ जबाबदारी?, लवकरच बांधणार शिवबंधन

शरद पवारांनी पहिला उमेदवार केला जाहीर; ‘हा’ 25 वर्षीय तरुण उतरणार रिंगणात

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी