बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला’; वरूण गांधींवर सामनातून कौतुकाचा वर्षाव

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदला हाक दिली आहे. अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन संजय राऊतांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन करताना सामनातून भाजप खासदार वरूण गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

आजच्या सामना अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. लखीमपूर खीरी येथील हत्येचा साधा निषेध केंद्रातील मोदी सरकारने केला नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषीमंत्री यांनी साध्या संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. भाजपच्या किती नेत्यांनी लखीमपूरच्या या घटनेचा धिक्कार केला? अशी जळजळीत टीका सामनातून करण्यात आली आहे.

पण भाजपचे खासदार वरूण गांधी हे एकमेव अपवाद असल्याचं म्हणत सामनातून वरूण गांधींवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही सांगण्याची हिंमत दाखवली पण त्यांना आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना पक्ष कार्यकारणीतून वगळून शिक्षा केली, असंही संजय राऊतांनी अग्रलेखात लिहिलं आहे.

लखीमपूर खीरीचा भयंकर प्रकार पाहून त्यांचे रक्त संतापले. वरूण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला आणि त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही. त्यांनी शेतकरी आंदोलनाची उघडपणे बाजू घेतली. वरूण गांधी धाडसाने बोलले, या शब्दात सामनातून वरूण गांधींवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

कोहलीने धोनीसाठी केलेल्या ‘या’ ट्विटची सोशल मीडियावर रंगलीये चर्चा

”प्रियंका गांधीला झाडू मारावी लागली त्यात महाविकास आघाडीला वाईट वाटायचं कारण काय?”

तो आला, त्यानं पाहिलं… अन् चौकार-षटकार मारुन पुन्हा जिंकून दिलं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More