“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”; ‘या’ खासदाराने केली भविष्यवाणी

Sanjay Raut | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आता निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. महायुतीकडे यंदाच्या निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजना’ हा मुद्दा आहे. महायुतीकडून या योजनेबाबत जोरदार प्रचार केला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. अशात त्यांनी आम्हाला पाठबळ द्या, माझी लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहील. हा दादाचा वादा आहे, असं म्हटलंय.यावरूनच शिवसेना ठाकरे(Sanjay Raut) गटाच्या खासदाराने अजित पवारांना डिवचलं आहे.

“बारामतीमध्ये अजित पवार स्वतः पराभूत होणार आहेत. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील.”, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

“लाडक्या बहिणीच अजित पवारांचा पराभव करतील”

“लाडकी बहिण योजना ही चांगल्या हेतूने आणलेली नाही. फक्त महिलांची मतं मिळावीत, या हेतूने ही योजना आणलीये. पण, लाडक्या बहिणी या इतक्या लाचार नाहीत. हे सर्व बोलणारे सरकारी लोचक मजनू आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.”, अशी टीका राऊत यांनी केली. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.

पुढे त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर देखील निशाणा साधला.”भ्रष्टाचार आमदारांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी तर नगरसेवकांची किंमत 5 कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये?, तेही पैसे मत दिले नाही तर परत घेण्याची भाषा केली जात आहे.ही या महाराष्ट्राची अवस्था आहे”, असा संताप संजय राऊत (Sanjay Raut)यांनी व्यक्त केला.

रवी राणांवर संतापले संजय राऊत

यावेळी राऊत यांनी आमदार रवी राणा यांच्या विधानाचा देखील समाचार घेतला. रवी राणा यांनी अमरावतीत एका कार्यक्रमामध्ये महिलांना उद्देशून म्हटलं होतं की, तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन.

रवी राणा यांच्या या विधानावरून आता वाद निर्माण झाला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. “रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत आणि ते असे बोलतात. सगळे नेते असेच त्यांच्या सारखे बोलताय. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहे का? यांची मानसिकता सरकारी पैशाने मते विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू”, असं संजय राऊत (Sanjay Raut)म्हणाले आहेत.

News Title : Sanjay Raut predict about Ajit Pawar 

महत्वाच्या बातम्या-

“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले

‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’, राखी पौर्णिमेनिमित भाजपचा खास प्लॅन

या राशीच्या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवा अन्यथा…

Diabetes आणि BP कंट्रोलमध्ये ठेवतील ‘हे’ 5 पदार्थ; वजनही होईल कमी