Top News महाराष्ट्र मुंबई

“ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्या हेतूवर शंका; पडद्यामागून कोण हालचाली करतंय हे मला माहितीये”

मुंबई |  अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्यावर हेतूवर मला शंका येतीये, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत आत्महत्या चौकशी प्रकरणात राजकारण करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई पोलिस दल किती सक्षम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मग त्यांच्या तपासामध्ये हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारत पडद्यामागून कोण हालचाली करतंय याची मला माहितीये आहे पण मी आताच कुणाचीही नावं घेणार नाही. योग्य वेळी मी यावर बोलेन, असं राऊत म्हणाले.

मुंबई पोलिसांनी इतका उत्तम तपास करून देखील केंद्राने हे प्रकरण सीबीआयच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि पोलिस या प्रकरणात काहीतरी लपवू पाहत आहेत, असा आरोप जे कुणी करत आहेत त्यांच्याचबद्दल मला शंका येते आहे, असंही राऊत म्हणाले.

दुसरीकडे सुशांत चौकशी प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, “शरद पवारांनी मला फोन करून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नेत्यांबद्दल अपमानास्पद बोलणं आम्ही सहन करणार नाही”

महत्त्वाच्या बातम्या-

गुगल त्यांची सर्वात प्रसिद्ध असलेली ‘ही’ सुविधा बंद करणार…!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…..

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या