महाराष्ट्र मुंबई

“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”

मुंबई | मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही. माझ्याकडे सगळ्यांचे हिशोब आहेत. तुमच्या कुटुंबाच्या व्यवहाराचाही आमच्याकडे हिशोब आहे. राजकीय सुडाला राजकीय सुडानेच उत्तर दिलं जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे. असं भाजप नेते म्हणत आहेत. बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

एकनाथ खडसे यांना नोटीस आलेली आहे. जे प्रमुख लोक आहेत. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत जे सहभागी आहेत. त्यांना कागदाचे तुकडे पाठवले जात आहे. ही त्यांची हतबलता आहे. त्याचे वैफल्य आहे. राजकारणात समोरासमोर लढायला हवं, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण

रनआऊट दिल्याच्या निर्णयावर कर्णधार अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

बीडच्या तरुणाकडून तरुणीवर कारमध्ये अत्याचार; गजबजलेल्या भागातील घटनेनं औरंबादमध्ये खळबळ

नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल- संजय राऊत

भाजपला रोखणाऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जात आहेत- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या