Top News विधानसभा निवडणूक 2019

पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल; वाढदिवसादिनी संजय राऊतांची गर्जना

मुंबई | राज्यात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल, अशी गर्जना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही.. आम्ही कायम सत्तेत राहू. येत जात राहणार नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

काँग्रेस राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे आम्ही निश्चित चांगलं सरकार चालवू. आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर काम सुरू आहे. वाजपेयींचे सरकार देखील किमान समान कार्यक्रमावर चालले असल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील सत्तावाटपावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत. यावरच सत्तेच्या फॉर्म्युल्याची चिंता तुम्ही करू नका, उद्धव ठाकरे योग्य तो फॉर्म्युला ठरवतील, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या