बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद, नेमका कोणता गौप्यस्फोट करणार?

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर तोफ डागली होती. हा फक्त ट्रेलर आहे पुढील काही काळात आणखी पुरावे देणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला होता. त्यातच आता पुन्हा एकदा ट्विट करत संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र निल सोमय्या यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. तसेच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले दाखवून द्यावेत, असं आवाहन केलं होत. जोडे खाण्याची हिंमत ठेवावी, असंही म्हटलं होतं. संजय राऊतांनी बोलताना केंद्रीय तपास यंत्रणांना इशाराही दिला होता.

संजय राऊतांच्या गेल्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना कमालीची आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. पुन्हा शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या वेळीही संजय राऊतांनी 4 वाजता आणि शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान, गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात येत आहे. सुदिन ढवळीकर,विजय सरदेसाई, दिगंबर कामत गिरीश चोडणकर यांचे फोन टॅपिंग सुरू आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. खेळ नुकताचं सुरू झाला आहे आणि पीएमओकडे पुरावे दिले आहेत, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं. उद्याच्या पत्रकार परिषदेत नेमके कोणते खुलासे करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“हे सरकार बेवड्यांसाठी पॉलिसी करू शकतं, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही”

धक्कादायक! मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

मोठी बातमी! नवाब मलिकांना ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More