बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंडित नेहरू, मोरारजी देसाईंना माफी मागावी लागली होती, आपण कितीही हुशार असलो…”

मुंबई | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाही फेकल्याची धक्कादायक घटना काल नाशिक येथे घडली. यावरून शिवसेना नेते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. नाशिक येथे साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली होती. यावरून संजय राऊत यांनी घटनेचा निषेध करत गिरीश कुबेर (Girish Kuber) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, नाशिक येथे साहित्य संमेलनात जो प्रकार झाला, त्याचा आम्ही निषेध करतो. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्राने देशाला दिलेले आहेत. त्यांच्याविषयी लिखाण करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यावधी लोकांच्या भावना युगपुरूषांशी जोडल्या आहेत, असा समजूतीचा इशाराही त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडीत जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली होती. तसेच जेम्स लेनच्या लेखनावरून राज्यात आणि देशात वादळ उठलं होतं,’ असं सांगून पुढे ‘आपण कितीही हुशार, विद्वान असलो, तरी महापुरुषांविषयी लिहीताना भान असायला हवं,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, नाशिक येथे 94 वे साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने शाही फेकली. कुबेर यांनी लिहीलेल्या ‘Renaissance State’ या पुस्तकावरून सुरु असलेल्या वादामुळे त्याने असं केलं असल्याची माहिती आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी राजे आणि महाराणी येसुबाईंबद्दल वादग्रस्त लिहीलं असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.

थोडक्यात बातम्या-

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More