Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

मुंबई | महाविकास आघाडी सरकारचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवार यांना “तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी स्वतःच्या खास शैलीत उत्तर दिलं.

शरद पवार म्हणतात, “दोन्ही नाही… हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. तर दुसरीकडे लोकशाहीत शासन आणि प्रशासन रिमोटने कधी चालत नाही.  रिमोट चालतो कुठे? जिथे लोकशाही नाही तिथं, आपण रशियाचं उदाहरण पाहिलं. पुतीन २०३६ पर्यंत अध्यक्ष राहणार. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सर्व बाजूला केलेलं आहे.”

“त्यामुळे आपण म्हणू त्या पद्धतीने सरकार चालवले पाहिजे, हा अट्टाहास आहे, मात्र इथं लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधीच चालू शकत नाही, मला ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ चालवत आहेत,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, संजय राऊत यांनी या मुलाखतीत शरद पवार यांना अनेक बेधडक प्रश्न विचारले, त्या बेधडक प्रश्नांची शरद पवार यांनी तितक्याच बेधडकपणे उत्तरं दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 7862 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

लॉकडाऊनची घोषणा करताना अजित पवार काय म्हणाले?, वाचा सर्व महत्त्वाचे मुद्दे

पुण्यात ‘या’ चार ठिकाणी तीन हजार बेडची व्यवस्था करणार- शेखर गायकवाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या