बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर तो आग्रह आम्ही पाळू”

नागपूर | शिवसेनेच्या (Shivsena) शिवसंपर्क अभियानाला आजपासून सुरूवात होत आहे. यासाठी शिवसेनेचे खासदार तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत. त्यानुसार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोमवारी संध्याकाळी नागपूरात दाखल झाले.

संजय राऊत यांच्या विदर्भ दौऱ्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना विचारणा करण्यात आली. यावेळी राऊत यांनी नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करू शकते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

अमृता फडणवीस यांनी दिलेल्या या सल्ल्यावर संजय राऊत यांनी हसत हसत प्रतिक्रिया दिली आहे. वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू असं म्हणत आपण नक्की सावजी खाऊ, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुळचे नागपूरचे आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना नागपुरचे लोकप्रिय असलेल्या सावजीची चव घेण्याचा सल्ला दिला.तर राऊतांनीही सावजी नक्की खाऊ, अशी प्रतिक्रिया दिली.

थोडक्यात बातम्या-

“उरलेले दोन तास सुद्धा मोदींना झोपू द्यायचं हे नाही त्यांनी ठरवलंय”

जो बायडन यांच्या वक्तव्यावर रशियाची नाराजी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

Russia Ukraine War: …म्हणून रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्यास नाटोने दिला नकार

Cyclone Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More