बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

मुंबई | महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि विभिन्न धोरणं असलेले पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्याला आता जवळपास दोन वर्षे पुर्ण झाली. पण या दोन वर्षात अनेकवेळा महाविकास आघाडीमधील नेत्यांची धूसफूस बाहेर येताना पाहायला मिळालं. त्यातच काल राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या ट्विटचीच चर्चा रंगली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नितीन राऊत यांनी आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्या ट्विटनंतर नितीन राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेचा वर्षाव होत असताना पाहायला मिळाला. या सर्व प्रकरणानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सुर्याचं तेज त्याला जाळून टाकेल, अशा तिखट शब्दात आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांची धूसफूस या ना त्या कारणाने समोर येत असताना पाहायला मिळत आहे. माकड आपला वंशज आहे आणि त्याला वंशज माणलंच पाहिजे, असं यावेळी संजय राऊतांनी बोलून दाखवलं.

दरम्यान, नितीन राऊतांच्या ट्विटनंतर संजय राऊतांनी म्हटलं की, मुख्यमंत्री स्वत: सावरकरवादी आहेत, सावरकरांना अनेकवेळा खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू, ते कायम महानायक राहतील आणि स्वातंत्र्यलढ्यातील सावकरांचं नाव कुणालाही पुसता येणार नाही. या सर्व प्रकरणात आता नितीन राऊत नेमकी काय प्रतिक्रीया देणार? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

पंतप्रधानांचा हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

गौतम गंभीर म्हणतो,”हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही तर…”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More