नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने (ED) कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे भाऊ व व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधीची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत त्यांनी हे लक्षात ठेवावं की यांची लाकडं रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचं रामराम म्हणावं लागेल, अशी घणाघाती टीका देखील संजय राऊतांनी नागपूर येथे बोलताना केली आहे.
दरम्यान, या कारवायांमुळे सरकार अस्थिर होत नाही. उलट ज्या काही फटी होत्या त्या बुजल्या गेल्या आहेत. यामुळे तीन पक्ष इतके एकत्र आले आहेत की ते तुटणं शक्य नाही, असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले, ‘या’ 2 अटी मात्र कायम
मोठी बातमी! युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाचं धक्कादायक पाऊल
सर्वसामान्यांना धक्का, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा ताजे दर
‘मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणे’; व्हिडीओ शेअर करत मनसेची तुफान टोलेबाजी
“बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?”
Comments are closed.