बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं- नाना पटोले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांमध्ये चलबिचल असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा तर केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यावर शिवसेनेने नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेतला होता. त्यावर आता नाना पटोले यांनी प्रेमळ उत्तर दिलं आहे.

आजच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझंच मत मांडलं. भाजपने देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलंय, काँग्रेस राज्य आणि देशात लढाई लढत आहे. विरोधक सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही आमची लढण्याची भूमिका आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 2024 ला महाराष्ट्रात काँग्रेसच नंबर वन पक्ष असेल, अशी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली. तसंच महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली. कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्यानं राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केलं. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळालं असेल तर ते बरंच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकलं असं वाटत नाही, असं अग्रलेखातून शिवसेनेनं म्हटलं होतं.

दरम्यान, नाना पटोले यांना सुरू दोन दिवसांपासून नरम झालेला दिसत आहे. पण काँग्रेसच्या स्वबळावर त्यांनी भुमिका बदलली नाही. सध्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आल्यापासून बैठकीचा धडाका लावला आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाजुद्दिन सिद्दीकीचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली ‘मला वाघ मिळालाय’

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

“एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न”

“भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय”

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More