Top News देश

ही यादी घ्या, पण गाड्या योग्य स्टेशनवरच पोहचवा; राऊताचं रेल्वेमंत्र्यांना कडक प्रत्युत्तर

मुंबई |  श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडून महाराष्ट्र सरकारवर सुरु असलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक विनंती आहे, ज्या स्टेशनवर ट्रेन पोहोचायला हवी, ती त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी. गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये, असं सणसणीत प्रत्युत्तर राऊत यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही आम्हाला पुढील एका तासात मजुरांची यादी द्या. तुम्ही जितक्या ट्रेन सांगाल, तितक्या ट्रेन उपलब्ध करुन देऊ, असं ट्विट रेल्वेमंत्र्यांनी केलं होतं. त्यांच्या याच ट्विटला राऊत यांनी रिप्लाय करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना केंद्राकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं. रेल्वे मंत्रालय मजुरांसाठी सोमवारी महाराष्ट्रात 125 श्रमिक ट्रेन पाठवायला तयार आहे. मात्र, राज्य सरकार मजुरांचा तपशील देण्यास उशीर करत आहे, असं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं.

संजय राऊतांनी आपल्या ट्विटमधून रेल्वेमंत्र्यांना उत्तर दिलं. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये’.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

आज राज्यात 1196 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा तुमच्या भागात किती नवे रूग्ण मिळाले…

…म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या