Sanjay Raut | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्राची भाषा घाण केली, अशी टीका केली होती. त्याला आता राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो, असं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला. (Sanjay Raut )
“जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
“आम्ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत. राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. भाजपाची स्क्रिप्ट आहे. फडणवीस यांचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच”, अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
माझं बरंचसं आयुष्य बाळासाहेबांबरोबर गेलेलं आहे हे राज ठाकरेंसहीत सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची, काय लिहायचं आणि काय बोलायचं याची मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे. बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
शुक्रवारी झालेल्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राऊत यांच्यावर नाव घेता टीका केली होती. “अख्खी भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक ‘भिकार संपादक’ इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहे. कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. याला वाटतं आमच्याकडे तोंड नाहीयेत. आमचं जर तोंड सुटलं ना… त्यांना कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ XX समजू नये यांनी,”असं राज ठाकरे म्हणाले होते. यालाच राऊत (Sanjay Raut ) यांनी आज प्रत्युत्तर दिलंय.
News Title – Sanjay Raut reply to Raj Thackeray Criticism
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार; IMD कडून महत्वाचा इशारा
सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर
नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘गुलामीच्या काळात..’
देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत