बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रभू रामचंद्र भाजपच्या विरोधात गेले, शिवसेनेचा भाजपला टोला

नवी दिल्ली प्रभू रामचंद्र भाजपच्या विरोधात गेले, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. 

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदार संघामध्ये समाजवादी पक्षाने भाजपला धूळ चारली आहे. बिहारमध्येही तीन विधानसभांपैकी दोन जागांवर भाजपला पराभव सहन करावा लागलाय. 

दरम्यान, हीच संधी साधून शिवसेनेनं भाजपवर वार केलाय. भाजपनं आता हवेत उडणं सोडून द्यावं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More