Top News देश

“अमित शहा यांना जरी कोरोना झाला असला तरी गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे”

मुंबई |  गृहमंत्री शहा यांच्यावर कोरोनाने झडप घातली व शहा यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही. अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्रक्रिया करीत असतात, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

अमित शहा यांना जरी कोरोना झाला असला तरी गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे. गृहमंत्री एकांतवासात गेले तसे गेहलोत यांनाही त्यांच्या आमदारांना घेऊन एकांतवासात जावे लागले. म्हणजेच धोका कायम आहे!, असं टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टोलेबाजी करत भाजपला राऊत यांनी चिमटे काढले आहेत.

पंतप्रधान मोदींचे निकटवर्ती म्हणून तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे प्रमुख सहकारी म्हणून शहा हे पंतप्रधानांच्या निकट असतात, पण श्रीरामाच्या आशीर्वादाने पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांचा बालही बाका होणार नाही. या कामी राहुल गांधी यांनी अमित शहांना दिलेल्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत, असं राऊत म्हणालेत.

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची वाढलेली वये पाहता त्यांनी ‘संसर्ग’ टाळावा व अयोध्येत पोहोचू नये असा सल्ला देण्यात आला व त्याबरहुकूम आडवाणी-जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच अयोध्या सोहळ्यात सहभागी होतील, अशी खंत व्यक्त करत आडवाणी यांनी वयाची नव्वदी पार केली, पण रामजन्मभूमी लढ्याचे ते शिलेदार होते, अशी आठवण राऊत यांनी भाजपला करून दिली आहे.

पंतप्रधान मोदी स्वतः अयोध्येत जाऊन भूमिपूजन करतील. उमा भारती शरयू किनार्‍यावरून ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील. आडवाणी, मुरली मनोहर दिल्लीत बसून रामजन्मभूमी लढ्याचा गोड शेवट अनुभवतील. बाकी मंचावरचे प्रमुख अतिथी श्रीरामांचे मंदिर उभारणीचे कार्य पुढे नेतील. संपूर्ण देश अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याने रोमांचित झाला आहे. देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नाही. कोरोना वगैरे आहेच. तो अयोध्या, उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात आहे. रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राची आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्दैव म्हणजे राजकारण्यांनी ब्र देखील काढला नाही!

कोरोना अलर्ट… जागतिक स्तरावर कोरोनाचा मृत्यूदर तब्बल ‘इतक्या’ पटीनं वाढला!

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

अजितदादांना मुख्यमंत्री बनलेलं बघायचंय, राखीपोर्णिमेनिमित्त बहिणीची इच्छा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या