Top News

अजित पवार स्टेपनी, ती गाडीला लागली आहे- संजय राऊत

पुणे | आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येत नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

लोकमत पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात संजय राऊत यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दिलखुलासपणे अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवारांना जेव्हा ते( भाजप) घेऊन गेले तेव्हा मला काहीही वाटलं नाही, मी निर्ढावलेला माणूस आहे, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केले. महाविकास आघाडीची गाडी सुसाट निघाली आहे. त्यामुळे तिला थांबवणं शक्य नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान,  उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं वादग्रस्त वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं आहे. त्यामुळे राऊत-उदयनराजे वाद चिघळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या-

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे- संजय राऊत

मी दाऊद इब्राहिमला सुद्धा दम भरलाय, हिंमत असेल तर अंगावर या- संजय राऊत

छत्रपतींच्या पुस्तकाचा वाद संपला, जुनी मढी उकरु नका- शिवसेना

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या