Top News विधानसभा निवडणूक 2019

“शिवसेनेला युती करायची नव्हती, अमित शहा ‘मातोश्री’दारी आल्याने युती झाली”

मुंबई | शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपने केली होती. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिवसेनेला युती करायची नव्हती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ‘मातोश्री’दारी आल्याने युती केली, असा टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेला विचारात न घेता आम्हाला एनडीएतून बाहेर कसं काढलं? एनडीए कुणाची संपत्ती नाही, असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.

एनडीएला विचारात न घेता घराच्या बाहेर काढून भाजपनं त्यांची खरी नियत दाखवली आहे. आम्हालाही भाजपसोबत युती करण्याची इच्छा नव्हती. मात्र अमित शहा मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुखांना विनंती केली म्हणून युती झाली, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, निकालानंतर मागणी मान्य न झाल्याचं सांगत शिवसेनेनं वेगळी वाट धरली आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या