मुंबई | सामना दैनिकात लिहिलेल्या रोखठोक लेखाच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सध्या देशात सुरू असलेल्या महात्मा गांधींजींच्या बदनामीवर भाष्य केलं आहे. नथुराम गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही, असं ते म्हणाले आहेत.
महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही. त्याचं हे मोठेपण मान्य करूनच नथुराम गोडसे याने आधी गांधींच्या पायाला स्पर्श करून मगच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोडसे प्रेमींनी गांधींवर टीका करताना गोडसेची सभ्यताही स्वीकारायला हवी, असं राऊत म्हणाले आहेत.
गोडसे याने अखंड हिंदुस्तानच्या ध्यासापायी गांधींवर गोळ्या झाडल्या तो अखंड हिंदुंस्थान निर्माण करा. हे करण्याचे कुणाच्यात साहस आहे काय?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
मधल्या काळात महाराष्ट्रात गोडसेची पुण्यतिथी साजरी झाली तर उत्तर प्रदेशात गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गोडसेला श्रद्धांजली वाहण्यात आली. गांधी प्रतिमेवर गोळ्या झाडून असुरी आनंद मिळवण्याची आवश्यकता नाही, असं ते म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
मनसेच्या मोर्चात भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही सहभागी होणार- संदीप देशपांडे
मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात; शिवसेनेचा आरोप
महत्वाच्या बातम्या-
तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच का?; शर्मिला ठाकरे म्हणाल्या…
गांधींवर टीका करताना गोडसेची सभ्यता स्वीकारा- संजय राऊत
“…याचं श्रेय निश्चितच गांधी, नेहरू आणि पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांना जाते”
Comments are closed.