मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया सोडू नये. कारण त्यांनी सोशल मीडिया सोडला तर त्यांचे करोडो फाॅलोवर्स अनाथ होतील, असा मिश्किल टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयाची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकून त्यांच्या करोडो फाॅलोवर्सना अनाथ करू नये. असं करणं चांगलं नाहीये. मोदींचे करोडो फाॅलोवर्स म्हणजे त्यांचे सायबर योद्धे आहेत. सेनापतींच्या आदेशावर योद्धे काम करत असतात आणि सेनापतीच जर सोशल मीडियाचं मैदान सोडत असतील तर त्यांची फौज काय करणार?, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही मोदींना खोचक टोला लगावला आहे. मोदींच्या निर्णयामुळे देशाचं भलं होईल. त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं ते म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
…जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत- रामदास आठवले
राहुल गांधींची मोदींवरील टीका भाजपला झोंबली; दिलं सणसणीत उत्तर
महत्वाच्या बातम्या-
पवारांचा धसका घेऊन मोदींनी ‘तो’ निर्णय घेतला असावा; भाजप आमदाराची टोलेबाजी
विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानं सुनेनं खोटे आरोप केले- विद्या चव्हाण
“सगळ्या मोदी भक्तांनी सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल”
Comments are closed.