Top News

अंगावर येणाऱ्यांनो…तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही- संजय राऊत

मुंबई | जे माझ्या अंगावर येऊ पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही. मी फाटका माणूस आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नाशिकच्या महाकवी कालिसाद मंदिरात राजू परुळेकर यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे तुफान फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मी काही शिल्पकार नाही. मी फाटका माणूस आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार यावं हे जनतेच्या मनात होतं. त्यामुळे हे सरकार आलं, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राऊत यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. माझा फोन टॅप केला तर त्यांना कळेल की संजय राऊत किती उत्तम शिव्या देतो, असं म्हणत त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या