मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मोजक्या 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, फडणवीसांनी त्यामधून लवकर बरं व्हावं, असं वक्तव्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी त्यामधून लवकर बरं व्हावं अशी मी सदिच्छा आम्ही देतो. कारण, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे.”
“11 कोटी जनतेचे आशीर्वाद या सरकारच्या मागे आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार.महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, वादळ आणि इतर संकटाला तोंड देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डगमगले नाहीत. चिखलफेक झाली तरी ते राज्याचा कारभार करत आहेत,” असंही राऊत यांनी सांगितलं.
शिवाय आता यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात ‘महा’राष्ट्र, ‘महा’विकासआघाडी अशा महा गोष्टीच घडतील, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे
राज्यातील तरूणांनी उद्योगधंद्याकडे वळावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
“बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत”
“भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र आहे”
Comments are closed.