मुंबई | उदया (दि. 30) विधानसभेत महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यानुसार शिंदे गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. एकीकडे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदारांनी घरी यावे असे वाटत आहे आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मनधरनी करण्याचे प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे खासदार संजय राऊत हे त्यांना खालच्या शब्दात बोलून अपमान करत आहेत. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भाषा घसरते आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना या कारणावरुन पेचात पकडले आहे.
शिंदे गटातील इतर आमदारही राऊत यांच्या भाषणांवर नाराज आहेत. त्यामुळे संजय राऊत आता काहिशी मवाळ भुमिका घेताना दिसून येत आहेत. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पत्रकारांनी त्यांना यावेळी बंडखोर आमदारांनी त्यांच्याविषयी उपस्थित केलेल्या नाराजीविषयी प्रतिक्रिया विचारली. यावर राऊत म्हणाले, ठीक आहे, मी आजपासून बोलायचे थांबतो. पण मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे.
शिंदे गट आणि त्यांना छुपा पाठींबा असलेल्या लोकांचे महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे. त्याविरोधात मी बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत. मित्र आहेत. मी काय आहे हे त्यांना माहित आहे आणि ते काय आहेत हे मला माहित आहे. आदित्य ठाकरे त्यांच्यावर टीका करतात असे बोलून चालणार नाही. ते पक्षाचे नेते आहेत, शिवसैनिकांचा उद्रेक झाला आहे, आदित्य त्यांच्यासोबत बोलणारंच, असे संजय राऊत यांनी म्हटले.
थोडक्यात बातम्या –
“राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येणार”; मोठी स्ट्रॅटेजी आली समोर
राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…
“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”
“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”
भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…
Comments are closed.