बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रश्मी ठाकरेंच्या संपत्तीबाबत सोमय्यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या राज्यात गेल्या काही दिवसांपासुन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आरोपांची खैरात करताना दिसत आहेत. किरीट सोमय्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नवीन आरोप केले आहेत. येत्या 27 सप्टेंबरला किरीट सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अलिबाग येथील संपत्तीची पाहणी करणार आहेत. तसेच, रश्मी ठाकरे यांनी बंगल्याचा घोटाळा केला आहे, असा आरोप सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केला आहे.

किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. आपल्या देशात लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. याआधीही अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. काही जणांनी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही, असं संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर देखील आरोप होतात. आजकाल आरोप करणं, फॅशन झाली आहे, त्यानुसार सोमय्यांनी आरोप करत रहावेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आणि तपास यंत्रणा आहेत. राज्यातील तपास यंत्रणा निष्पक्षपणे तपास करत आहेत. तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील प्रमुख मंत्र्यांवर आणि लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून जर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत असेल तर, राज्याचे गृहमंत्री कारवाई करू शकतात, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काल किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीची पाहणी करण्यासाठी रविवारी जात असताना, सोमय्यांना कराड येथे पोलिसांनी थांबवलं आहे. त्यानंतर सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

थोडक्यात बातम्या –

चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राला पटलेलं गोड स्वप्न- रूपाली चाकणकर

किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली?, गृहमंत्री म्हणाले…

“बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शुन्यापेक्षाही कमी”

“काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर…”; काँग्रेसचं पाटलांना प्रत्युत्तर!

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More