Top News महाराष्ट्र मुंबई

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

Loading...

मुंबई |  कोरोनाने सगळ्या जगाची धांदल उडाली आहे. अनेक देशांमधली आरोग्य प्रणाली उत्तम असूनही त्यांना कोरोनाशी दोन हात करण्यात म्हणावं असं यश आलेलं नाही. त्यामुळे नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसंच राज्य सरकारांचं बजेट आणि तो कोणत्या खात्याला किंवा क्षेत्राला किती निधी द्यायला पाहिजे याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात यावर दीर्घ भाष्य केलं आहे.

देशभरातील सर्व अर्थमंत्र्यांशीही पंतप्रधानांनी एकदा संवाद साधायला हवा. यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावरच सर्वाधिक खर्च करावा लागेल. या शर्यतीत बिहार, ओडिशा, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेशसारखी राज्ये कोठे असतील? केंद्राला सर्वाधिक बजेट याच क्षेत्रांवर खर्च करावे लागेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

साहजिकचकेंद्राला उत्पन्नाचे स्रोत नव्याने शोधावे लागतील. हिंदुस्थान हे संघराज्यातून निर्माण झाले आहे. प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे, असंही ते म्हणाले आहेत.

कोरोनाने सगळ्याच राज्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह सर्वच देशांनी जीडीपीच्या 10 टक्के आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. अशाच प्रकारचे आर्थिक पॅकेज केंद्र सरकारने राज्यांना जाहीर करावे, अशी पवारांनी मागणी केली आहे ती मागणी बरोबरच आहे, असंही राऊत यांनी अग्रलेखात नमूद केलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ५२२ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा; हा कणा मोडू नका हेच पवारांनी केंद्राला सांगितलंय- संजय राऊत

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या