मुंबई | औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू मानलेलंच पण त्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचा भान पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!, असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील आणि व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल, असं अग्रलेखात म्हणत राऊतांनी काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग असल्याचं राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध”
“केंद्रीय मंत्री किंवा सरकारमधील कोणत्या नेत्याने लस का टोचून घेतली नाही”
…म्हणून पुढचे 2 दिवस मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरण बंद राहणार!
IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर दिसले आठवडी बाजारात
‘…त्यावेळी आम्ही कोरोनावरील लस घेऊ’; राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ