Top News महाराष्ट्र मुंबई

‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये- संजय राऊत

मुंबई | लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांचा जो काळ गोठला आहे त्याला जाग आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा हरिओमची घोषणा केली. ‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. म्हणून सरकारी दिलदारीचा गैरवापर कोणी करू नये, अशी अपेक्षा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांचा बंदीवास व देश गुलामीच्या बेड्यांत असताना ‘पुन:श्च हरिओम’ चा नारा दिला होता. आता ठाकरे सरकारने देश स्वतंत्र असताना आणि जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना तोच ‘पुन:श्च हरिओम’ चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. तूर्त तरी ‘पुन:श्च हरिओम’ चे स्वागत करूया, असं राऊत अग्रलेखात म्हणाले आहेत.

देशभरात सोमवारपासून पाचवी टाळेबंदी जाहीर झाली आहे, पण या टाळेबंदीतही जीवनास आरंभ करावा असे ठाकरे यांनी सुचवले आहे. टिळक तेव्हा तुरुंगातून मुक्त झाले व महाराष्ट्राची 11 कोटी जनता टाळेबंदीच्या तुरुंगातून या पुढे तीन टप्प्यांत मुक्त होणार आहे. जनतेने दोनेक महिने कडक तुरुंगवास भोगला आहे. या दोन महिन्यांत जीवनाची दिशा पूर्णपणे बदल, असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात दुकाने आलटून पालटून उघडली जातील. धार्मिक उत्सव होणार नाहीत व देवळेही बंदच राहतील. म्हणजे माणसांना ‘पुन:श्च हरिओम’ करण्याची जी सवलत मिळाली आहे ती सवलत मंदिरांना मिळणार नाही. मंदिरांची टाळेबंदी कायम आहे. सलूनही उघडणार नाहीत. लोकांनी दुकानात किंवा बाजारात जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा. आता लोकांनी सायकली आणायच्या कुठून? व सायकल वापरायची सवय राहिली आहे काय? पण ही एक शिस्त आहे व ती पाळावी लागेल, असंही राऊत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, अन्यथा शाळांवर कारवाई करणार- शिक्षणमंत्री

धारावीत अवघ्या 15 दिवसांत कोविड रूग्णालय बांधून तयार, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या