बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…या स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे?, सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारला सवाल

मुंबई | महाराष्ट्रात नवे उद्योग पर्व सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली आहे. उद्योगांसाठीच्या अटी-शर्तीचे जाळे मोडले आहे. राज्यात या आणि उत्पादन सुरू करा, असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले आहे. अर्थात पायघड्या घातल्या म्हणजे लगेच नवा उद्योग पवनगतीने येईल व काम सुरू करील असे नाही. हे सर्व एका रात्रीत होणार नाही. नवे उद्योजक काही जादूची छडी घेऊन येणार नाहीत व सरकारकडेही अशी छडी वगैरे नाही. गुंतवणूकदारांना जमिनी विकत घेणे परवडत नसेल तर त्यांना भाडेतत्वावर जमिनी देऊ, असे मुख्यमंत्री महोदय सांगतात. इतर राज्यांत तेथील सरकारे गुंतवणूकदारांना जमीन, वीज, पाणी तूर्तास मोफत द्यायला तयार आहेत व त्यादृष्टीने त्यांनी जाळे फेकले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र कोठे आहे? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

कोरोनाचा धोका वाढू न देता राज्यात उद्योग सुरू करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. नवीन उद्योग नव्या पायघड्यांवरून येतील व त्यांचे स्वागतही करायला हवे, पण कोरोनाच्या विळख्यात जुने परंपरागत उद्योग गतप्राण झाले आहेत. त्यांच्यासाठी एखादा अतिदक्षता विभाग निर्माण करता येईल काय? अशी विचारणा देखील राऊत यांनी केली आहे.

पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपवण्याचा निर्धार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला आहे. हा निर्धार म्हणजे मोदींच्या आत्मनिर्भर प्रकल्पाचाच एक भाग असून मुख्यमंत्री ठाकरे यांचे विधान त्यादृष्टीने आशादायी असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘उद्योग पर्व’ ही कल्पना मांडली. या उद्योग पर्वात कष्टातून उभा राहीलेला महाराष्ट्र क्रांती घडवून दाखवेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

चाणाक्ष महिला सरपंच… मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह!

कोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

एकाच दिवसात 1200 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी… पाहा तुमच्या भागात काल किती नवे रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More