महाराष्ट्र मुंबई

‘…म्हणून शिवसेना आज भाजपसोबत नाही’; संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण

मुंबई | शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपपासून दूर जाण्याचं खरं कारण एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि राजकीय विषयावर भाष्य केलं आहे.

मागील 30 वर्षांपासून शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेनेमुळे युती तुटली, हा आरोप चुकीचा आहे. टाळी कधीही एका हातानं वाजत नाही. भाजपच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्यासोबत राहिली. पण, भाजपला सत्तेची लालची आहे. सत्तेसाठी ते आपल्या मित्र पक्षाचं बलिदान देऊ पाहत होते. त्यामुळे आज शिवसेना भाजपसोबत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकजुटीनं राज्यात काम करत आहे. त्यामुळे विरोधकांना डोकेदुखी सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप चुकीचा आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे, हे फडणवीसांनाही माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यानं ते आरोप करत आहेत. पण, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहराची स्थिती सगळ्यानांच माहिती आहे. राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नाशिकमधील शेतकऱ्याचं कौतुक!

लॉकडाऊन शिथीलतेनंतर चिंतेत भर, देशात गेल्या 24 तासांतला कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या