बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुबंई | एकनाथ शिंदेंच्या (Shivsena) बंडानंतर राजकारणाला रोज नवं नवं वळण मिळत आहे. यातच शिवसेनेचे महत्वाचे समजले जाणारे नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. यासंबधी आज न्यायालयात सुनावणी पार पडलीये.

पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. सुनावणी झाल्यांनतर राऊतांना 14 दिवसांची कोठडी सुणावण्यात आली आहे. राऊतांची कोठडी आता 22 ऑगस्ट पर्यंत असणार आहे.

30 जुलैला चौकशी झाल्यानंतर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुणावण्यात आली होती. तपासादरम्यान राऊतांनी आलीबागजवळची एक कोटीची जमीन खरेदी केल्याचा खुलासा ईडी (ED) अधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर अधिक तपासासाठी न्यायालयाकडून ईडीने अधिक वेळ मागितला होता. त्यामुळे न्यायालयाने ईडी कोठडीत वाढ करुन 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुणावण्यात आली होती.

राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackery) यांनी त्यांच्या कु़टुंबियाची भेट घेतली होती. ईडीने केलेली अटक खोटी असल्याचा आरोप संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं, प्रमाणपत्र रद्द

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

“…तर हे सरकारही जाऊ शकतं, तयारीला लागा”

‘बिग बॉस मराठी 4’ महेश मांजरेकर नाहीतर ‘हा’ अभिनेता होस्ट करणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More