Sanjay Raut | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर निकाल आला आहे.(Sanjay Raut )
सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे संजय राऊत यांना हा मोठा दणका बसला आहे.
2022 सालचे हे प्रकरण असून खासदार संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्या यांनी याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
संजय राऊत यांना 15 दिवसांचा कारावास
याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज 26 सप्टेंबररोजी या प्रकरणावर निकाल आला आहे. यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मेधा सोमय्या यांनी या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असे मला वाटते. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे.”, असं मेधा सोमय्या यांनी म्हटलं आहे.(Sanjay Raut )
Prof Dr Medha Kirit Somaiya v/s Sanjay Raut Defamation Case
Metropolitan Magistrate Aarti Kulkarni sentenced Sanjay Raut for 15 days imprisonment. ₹25,000 fine
We will meet Media today afternoon 1pm at BJP Office Nariman Point
Kirit Somaiya @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 26, 2024
नेमकं प्रकरण काय?
मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने त्यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी निकाल समोर आला असून त्यात संजय राऊत (Sanjay Raut ) हे दोषी आढळले आहेत.
News Title- Sanjay Raut sentenced to 15 days jail in Defamation case
महत्त्वाच्या बातम्या –
नागरिकांनो ‘या’ व्हिडिओंना लाईक कराल तर थेट होणार पोलीस चौकशी!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, दिलं हे कारण!
अक्षयच्या मृतदेहाचे दहन नव्हे तर दफन होणार, पण अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना
पुण्यात आज PM मोदींचा दौरा, वाहतुकीत झाले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर?